तळेगाव परिसरातील सर्व गणेश मंडळांनी मंडळाची माहिती पोलीस स्टेशनला सादर करावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी केली आहे
तळेगाव दाभाडे:
Advertisement
शहरात नुकतीच शनिवार दिनांक १९जुलै २०२५ रोजी सुशीला मंगल कार्यालयात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तसेच तळेगाव दाभाडे शहर हद्दीतील सर्व गणेश मंडळे यांची एक समन्वय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी गणेश मंडळासाठी काही सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक २९जुलै व बुधवार दिनांक ३०जुलै २०२५ दरम्यान तळेगाव दाभाडे परिसरात असणाऱ्या सर्व गणेश मंडळांनी आपल्या मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच इतर माहिती तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला तत्काळ सादर करावी असे आवाहन तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सर्व गणेश मंडळांना केले आहे.






