दुरुस्ती कामांमुळे एमआयडीसीचा पाणीपुरवठा खंडित; देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे नागरिकांना पाणी साठा करण्याचे आवाहन

SHARE NOW

देहूगाव :

 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्या विद्युत व यांत्रिकी उपविभागामार्फत करण्यात येणाऱ्या दुरुस्ती कामांमुळे परिसरातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहणार असल्याची माहिती अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

निवेदनानुसार, गुरुवार दि. ४ जून २०२६ रोजी सकाळपासून सुरू होणाऱ्या दुरुस्ती कामांदरम्यान पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. तसेच शनिवार दि. ६ जून २०२६ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येणार आहे.

Advertisement

या कालावधीत देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या वतीने सर्व नागरिकांना आवश्यक त्या प्रमाणात पाण्याचा साठा आगाऊ करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून, दुरुस्ती कामकाजासाठी सहकार्य करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page