अभ्यासिकेला रोटरी सिटीच्या वतीने पंखे भेट.
तळेगाव दाभाडे :रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी च्या वतीने तळेगाव दाभाडे शहरातील 106 वर्ष जुनी गणेश मोफत वाचनालयाला प्रांतपाल शितल शहा यांच्या हस्ते अभ्यासिकेला वॉल माउंटिंग फॅन भेट देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्रांतपाल यांनी ज्या अभ्यासिकेमधून 50 पेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन गेले आहेत अशा अभ्यासिकेला रोटरीच्या वतीने करण्यात आलेली मदत ही अतिशय बहुमोल आहे.
उन्हाळ्याचे दिवस पाहता या अभ्यासिकेला उष्णतेमुळे पंख्यांची आवश्यकता होती व ती गरज ओळखून रोटरी सिटी चे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी या अभ्यासिकेला तीन फॅन भेट देण्याचे नियोजन केले याबद्दल त्यांनी अध्यक्षांचे आभार मानले. याप्रसंगी गणेश मोफत वाचनालयाचे खजिनदार श्री यतीन शहा व प्रतीक भेगडे हे उपस्थित होते.
अभ्यासिकेची गरज ओळखून त्यांना फॅन भेट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी सांगितले. याप्रसंगी सहप्रांतपाल दीपक फल्ले क्लब ट्रेनर,दिलीप पारेख हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प प्रमुख प्रदीप मुंगसे त्यांच्या नेतृत्वाखाली दशरथ ढमढेरे,निलेश राक्षे,बसप्पा भंडारी,संग्राम जगताप,प्रशांत ताये,संतोष परदेशी,राकेश ओसवाल,प्रदीप टेकवडे यांनी केले.
सूत्रसंचालन दीपक फल्ले यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश दाभाडे यांनी केले.