तळेगांव दाभाडे औद्योगिक संघटना आणि औद्योगिक सुरक्षा संचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगांव एमआयडीसी मधील सर्व कंपन्यांसाठी सुरक्षा प्रशिक्षण व सुरक्षा स्पर्धांचे आयोजन
तळेगाव दाभाडे :
तळेगांव दाभाडे औद्योगिक संघटना आणि औद्योगिक सुरक्षा संचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६.०३.२०२५ रोजी तळेगांव एमआयडीसी मधील सर्व कंपन्यांसाठी सुरक्षा प्रशिक्षण व सुरक्षा स्पर्धांचे हॉटेल फर्न रेसिडेन्सी इथे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धांमध्ये तळेगांव एमआयडीसी मधील सर्व कंपन्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
औद्योगिक सुरक्षा संचनालयाच्या अतिरिक्त संचालक शारदा होंदुले व त्यांच्यासोबत औद्योगिक सुरक्षा संचनालयाचे उपसंचालक तृप्ती कांबळे यांनी कारखान्यात झालेल्या अपघातांची केस स्टडी याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. FEV आणि JCB या कंपन्यांतर्फ उपस्थितांना सुरक्षेसंबंधी बेस्ट प्रॅक्टिस यावर मार्गदर्शन करण्यात आले. तळेगांव दाभाडे औद्योगिक संघटनेच्या अध्यक्षा अनु सेठी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य केले. संघटनेचे सचिव माननीय जगदीश यादव व सदस्य विनायक साळुंखे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष कष्ट घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय विनायक साळुंखे यांनी उत्तमरीत्या पार पाडले.
सदर स्पर्धांमध्ये खालील स्पर्धक विजेते ठरले –
सुरक्षा पोस्टर श्रेणीमध्ये ऐश्वर्या ढमढेरे, स्वप्नील पहाड, गजानन मुंढे व जितेंद्र राणे यांनी विशेष प्राविण्य मिळवले. सुरक्षा कविता श्रेणीमध्ये दिलीप भेले, वैशाली सोलट, राजू लगड आणि विजय पाटील यानी विशेष प्राविण्य मिळवले, तर सुरक्षा घोषवाक्य श्रेणीमध्ये अमोल ठोंबरे, नजमा शेख, सत्यम लोधी आणि आदिनाथ ठोंबरे यांनी विशेष प्राविण्य मिळवले.