काळे कॉलनीतील पाणीपुरवठा सुरळीत करा. नगरसेवक अँड सचिन काळे यांची मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्याकडे निवेदनातुन मागणी.
आळंदी :काळे कॉलनीमध्ये आळंदी नगरपरिषदेच्या वतीने चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे तेही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.वारंवार पाणी सोडण्याच्या वेळाही पाणीपुरवठा अधिकारी बदलत आहेत. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा अधिकारी श्रद्धा गर्जे यांचे कोणतेही पाणीपुरवठ्यासंबंधी नियोजन नाही, शिवाय नागरिकांचा फोन उचलत नाहीत,नागरिकांना माहिती देत नाहीत, नागरिकांना स्वखर्चाने टंँकरने पाणी विकत घ्यावे लागते ,शिवाय नगरपरिषदेकडे टँकर उपलब्ध नाही म्हणून त्या नागरिकांना सांगत असतात. यामुळे नागरिक आमच्याकडे दररोज पाण्याची तक्रार घेऊन माझ्याकडे येत असल्याचे नगरसेवक अँड सचिन काळे यांनी सांगितले,नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून खुप मानसिक त्रास ही सहन करावा लागत आहे.असाच पाणीपुरवठा विस्कळीत राहिला तर मी व सर्व काळे कॉलनीतील नागरिकांना घेऊन नगरपरिषदेवर हंडा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा त्यांनी नगरपरिषदेचे सि.ईओ.माधव खांडेकर यांना दिला.
यावेळी अँड सचिन काळे,महादेव पाटील, मंगेश काळे, आत्माराम काकडे,दिगंबर सुतार,अनिल मोकाशी लक्ष्मण कवडे,राहुल व्यवहार,उर्मिला भारती ,सचिन थोरात,नारायण गिरी,तुकाराम कदम किरण ,सुतार वसंत चौधरी मनोहर ढोकणे सह अनेक नागरिक उपस्थित होते