पै.भाग्यश्री कोळी यांनी सुवर्णपदक मिळवून भारताचा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढवला…
पुणे

व्हिएतनाम येथे झालेली एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप ही आशियातील महत्त्वाची कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेत विविध देशांतील खेळाडू फ्रीस्टाईल, ग्रीको-रोमन आणि महिला कुस्ती प्रकारात सहभागी होतात.
2025 मध्ये ही स्पर्धा व्हिएतनाममधील वुंग ताऊ येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष कुस्तीपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत अनेक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके जिंकली. भारतीय महिला संघाने विशेष कामगिरी करून चॅम्पियन ट्रॉफीही मिळवली.
स्पर्धेची वैशिष्ट्ये:
आयोजन : व्हिएतनाम
प्रकार : आशियाई कुस्ती स्पर्धा
सहभागी देश : आशियातील अनेक देश
खेळ प्रकार :
• फ्रीस्टाईल कुस्ती
• ग्रीको-रोमन कुस्ती
• महिला कुस्ती
याच महिला कुस्ती स्पर्धेमध्ये पै. भाग्यश्री कोळी यांनी सुवर्णपदक मिळवून भारताचा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढवला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भाग्यश्री कोळी येणे महाराष्ट्र व देशासाठी हे सुवर्णपदक मिळवल्याने सर्व स्तरातून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रतिक्रिया
भाग्यश्री कोळी ही अतिशय ग्रामीण भागातून आलेली एक महिला कुस्तीपटू आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मात करत तिने अतिशय चांगली कामगिरी पार पाडले आहे तिच्या यशासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
मा. तानाजीराव सावंत
आमदार शिवसेना






