आंबेडकरी चळवळीतील लढवय्या महिलेचा मोबाईल शॉप मालकाकडून विनयभंग; कोंढवा येथे गुन्हा दाखल
पुणे : आंबेडकरी चळवळीतील एका लढवय्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन येथे ए.के. मोबाईल शॉपचा मालक फय्याज युसूफ खान (रा. १५४९, गल्ली क्र. १५, भीमपुरा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २१/०५/२०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ७५, ७८, ३५२ व ३५१(२) अन्वये सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने संबंधित महिलेला “काय रे, बहोत सोशल किडा है, मैं यहाँ का भाई हूँ” असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली तसेच तिचा विनयभंग करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच आरोपीचा भाऊ फिरोज खान हा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असल्याची माहिती समोर येत असून, त्याचा पोलीस एन्काऊंटर झाल्याचेही सांगितले जात आहे. तसेच आरोपीने अनेक नागरिकांना त्रास दिल्याचेही समोर आले आहे. आरोपीविरोधात कोणाकडे तक्रार असल्यास त्यांनी न घाबरता पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक व आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.






