माझी लाडकी बहीण योजना’साठी मोफत KYC शिबिरे — महिलांसाठी सुवर्णसंधी!
तळेगाव दाभाडे:
प्रभाग क्र. 03 मधील माता-भगिनींसाठी एक खास उपक्रम राबविण्यात येत असून मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत मोफत KYC शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे पात्र महिलांना सरकारी योजनेचा थेट लाभ मिळणार असून, कुठलाही शुल्क आकारला जाणार नाही.
या शिबिरांत मोफत KYC करून घेतल्यास योजनेंतर्गत लाभ अगोदरच प्राप्त होईल. प्रत्येक भागात स्वतंत्र ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
शिबिरांचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहेत —
1️⃣ लोमेटे कॉलनी – बुध. दि. 29 ऑक्टोबर
2️⃣ सत्यकामक कॉलनी (दत्त मंदिर) – गुरु. दि. 30 ऑक्टोबर
3️⃣ सम्राज्य विद्यालयाजवळ कॉलनी – शुक्र. दि. 31 ऑक्टोबर
4️⃣ रेणो कॉलनी (गणपती मंदिर) – शनि. दि. 1 नोव्हेंबर
5️⃣ मनोहर नगर प्रवेशद्वार – रवि. दि. 2 नोव्हेंबर
6️⃣ सिद्धी नगर – सोम. दि. 3 नोव्हेंबर
7️⃣ स्वप्ननगरी – बुध. दि. 5 नोव्हेंबर
महिलांनी आपले आधार कार्ड, पतीचे किंवा विधवा असल्यास विवाह नोंद प्रमाणपत्र आणि मोबाइल क्रमांक लिंक असलेले आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.
“तुमची KYC आमची जबाबदारी!” या घोषवाक्याखाली हा उपक्रम राबविला जात असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे एक प्रभावी पाऊल ठरणार आहे.
या मोहिमेचे नेतृत्व श्री. विशाल साहेबराव लोखंडे व सौ. प्रिया वहिनी विकी लोखंडे यांच्याकडून करण्यात येत आहे.
त्यांच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी काम करणारे हे शिबिर सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
—






