“महागाई, बेरोजगारी आणि महिलांच्या सुरक्षेवर काँग्रेसचा एल्गार”; देहूत वनिताताई देशकर यांनी मांडला आगामी नगरपंचायतीचा अजेंडा..!

SHARE NOW

देहू :

कमलाकर सातव यांच्या पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्तीनंतर श्री क्षेत्र देहुगाव येथे प्रथमच आगमन झाले. यावेळी देहू शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात देहूतील मुख्य विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन झाली. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री नंदकुमार काळे उपस्थित होते. त्यानंतर मधुकरजी कंद पाटील वाडा येथे काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

बैठकीत अध्यक्ष कमलाकर सातव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी काळात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. देहू व मावळ परिसरात काँग्रेसची विचारधारा घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

यावेळी देहूचे माजी सरपंच मधुकरजी कोंडीबा कंद पाटील, मावळ तालुका काँग्रेस समन्वयक सौ. वनिताताई देशकर, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश मुसुडगे, भाऊसाहेब कुंभार, अशोकराव चव्हाण, रेहमान भाई नागुलकर, इक्बाल भाई शेख, माजी देहू काँग्रेस अध्यक्ष रशिदभाई धोंडफोडे, नारायण भाऊ चव्हाण, सोमनाथ देशकर, अक्षयजी झेंडे पाटील, मुकुंद परंडवाल, अल्ताफ भाई शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मावळ काँग्रेसच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ. वनिताताई देशकर यांनी आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा अजेंडा कार्यकर्त्यांसमोर मांडला. वाढती महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, वाढते खाजगीकरण तसेच शैक्षणिक धोरणांवर त्यांनी टीका करत “काँग्रेस शिवाय देशाला पर्याय नाही,” असे ठाम मत व्यक्त केले.

देहूत झालेल्या या बैठकीमुळे आगामी नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page