मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या वतीने लोणावळा येथे आषाढ काव्य महोत्सव. *स्मृतीशेष केशवराव मारोतकर काव्य पुरस्काराचे वितरण वर्ष तेरावे*
लोणावळा :
मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीने यावर्षी लोणावळा येथे आषाढ काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि. २१ जुलै रोजी लोणावळाच्या मानेकलाल रिसॉर्ट, येथील सुसज्ज सभागृहात सुप्रसिद्ध साहित्यिक मा.राजन लाखे यांच्या अध्यक्षतेखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले असून याप्रसंगी गोवा येथील सुप्रसिद्ध कवयित्री प्रिया कालिका बापट आणि सतर्क न्यूज चॅनल च्या मुख्य संपादक मा.रेखा भेगडे,या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्मृतीशेष केशवराव मारोतकर स्मृती ‘पाऊस काव्य स्पर्धेचे ‘आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील
विजेत्यांना या महोत्सव प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सन्मानचिन्ह व सन्मानपत्रासह विजेत्यांना प्रथम – 1001 रुपये , व्दितीय-701/-,तृतीय 501/- रोख असे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .लोणावळा येथे जाऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे धाडस माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानने केलेले आहे. कविसंमेलनात प्रणोती कळमकर, उज्वला इंगळे, प्रतिभा सहारे ,डॉ.राजेश काळे, डॉ.अंजली टाकळीकर ,स्मिता किडीले, डॉ. साधना तेलरांधे,विजया कडू, मंगला नागरे,शालिनी कावरे, डॉ.मोनाली पोफरे, सुरेंद्र राऊत, मंदा खंडारे, संजीवनी काळे ,अरुणा कडू ,सुशीला कावलकर, सुनिता शहाकार, संपदा कावलकर या कवी कवयित्रींचा सहभाग राहणार आहे. दिनांक 22 आणि 23 जुलैला लोणावळा परिसरातील निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देताना प्रत्येक ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण असे साहित्यिक कार्यक्रमही आयोजित केलेले आहेत. अशा प्रकारे पावसाचा आनंद घेत आषाढ महोत्सव संपन्न करण्याचे उत्तम नियोजन करण्यात आलेले आहे .या कार्यक्रमाची संकल्पना मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या विजया मारोतकर यांची असून त्यांना सचिव मंगेश बावसे आणि कोषाध्यक्ष डॉ.माधव शोभणे यांचे उत्तम सहकार्य लाभलेले आहे. लोणावळा येथील ज्ञानेश्वर दुर्गुडे यांच्या उत्तम प्रतिसाद आणि सहकार्यामुळे हे आयोजन यशस्वीतेच्या मार्गावर वाटचाल करीत आहे.
आषाढ काव्य महोत्सवाचे यापूर्वी गोवा येथे आयोजन करण्यात आले असून आतापर्यंत आनंदवन वरोरा, निसर्गायन नागभीड, काटोल ,हिंगणा ,महादेव टेकडी, खसरमारी, खापरखेडा, शेतकरी केंद्र थडीपवनी,मातोश्री वृद्धाश्रम आदासा अशा निसर्गरम्य परिसरात वैविध्यपूर्णरित्या सुरेख यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे.