अनेक सन्मानचिन्हे आणि प्रशस्तीपत्रके देऊन इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेला गौरविण्यात आले.
तळेगाव दाभाडे :
दिनांक ६ जुलै रोजी पनवेल येथील डिस्ट्रिक्ट 313 च्या असेम्ब्ली मध्ये इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या शिरपेचात अनेक मानाचे पुरस्कार खोवले गेले. 2023-24 या इनर व्हील क्लबच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात केलेल्या भरीव कामगिरी बद्दल क्लब प्रेसिडेंट संध्या थोरात आणि सेक्रेटरी निशा पवार यांना सर्वोत्कृष्ट प्रेसिडेंट आणि सर्वोत्तम सेक्रेटरी टीम अवॉर्ड प्रदान करण्यात आले. याशिवाय पवन मावळातील तीन शाळांना आवश्यक सुविधांनी सुसज्ज करण्यात आल्याबद्दल सन्मानचिन्ह देण्यात आले. सशक्त महिला मजबूत जग, पर्यावरण संरक्षण, दिव्यांगाना मदत, आरोग्य आणि स्वच्छ्ता, युवा विकास कार्यक्रम, विद्यार्थिनींना शारीरिक व मानसिक स्तरावर सक्षम करणे, एक सदस्य एक प्रकल्प, इनरव्हील क्लबचे ब्रॅण्डिंग करणे तसेच जिल्हा पातळीवर घेण्यात आलेली ऑनलाईन लिंपन कला कार्यशाळा या व अनेक उपक्रमांकरिता भरघोस बक्षिसांनी डिस्ट्रिक्ट चेअरमन रचनाजी मालपाणी आणि असोसिएशन चेअरमन सुनिताजी जैन यांच्या हस्ते पनवेल येथे सन्मानित करण्यात आले. सौ संध्या थोरात यांच्या अध्यक्षतेखाली चार प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर तर दहा प्रकल्प असोसिएशन साठी निवडले गेले होते. यावेळी प्रेसिडेंट संध्या थोरात, जॉईंट सेक्रेटरी रश्मी थोरात, एडिटर आरती भोसले व आयएसओ वैभवी कारके उपस्थित होत्या.