*कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये जयघोषाने परिसर दुमदुमला*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे स्टेशन भागात कृष्णराव भेगडे इंग्लिश स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन देशभक्तिपर गीताने उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख अतिथी लायन्स क्लबचे अध्यक्ष अनिल तानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.यावेळी संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदीप काकडे, सचिव प्रशांत शहा,माजी नगरसेविका मंगलताई काकडे,खजिनदार गौरी काकडे, संचालिका सुप्रिया काकडे,संचालिका सोनल काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर उपस्थित होत्या. विद्यार्थिनींनी झेंडा गीत, राज्य गीत व देशभक्तीपर गीत सादर केले.विद्यार्थ्यांनी जय जवान जय किसान, वंदे मातरम,भारत माता की जय अशा घोषणा देत शाळेचे मैदान दुमदुमून टाकले. यावेळी अनिल तानकर यांनी सांगितले की थोर विचारवंतांच्या चारित्र्याचे वाचन करावे. त्यांचे विचार आपल्या देशाला प्रेरक ठरले आहेत.मीना अय्यर मनोगतात म्हणाल्या, की ‘विकसित भारत’ ह्या अब्दुल कलामांच्या स्वप्नाकडे आपण वाटचाल करत आहोत यासाठी प्रत्येक नागरिकांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेत भारताने दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकापर्यंत झेप घेतली आहे. यावेळी कार्यक्रमास पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सूत्रसंचालन व आभार विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा गायकवाड व कु. श्रेया भसे यांनी केले.