निधन वार्ता वसंतराव भेगडे पाटील
तळेगाव दाभाडे : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वसंतराव नथुभाऊ भेगडे पाटील ( वय ७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे.भारतीय नौदलातील उच्च पदस्थ अधिकारी सुशील भेगडे पाटील व विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र संयोजक संतोष भेगडे पाटील यांचे ते वडील होत.