किवळे गावात प्रीकॉल लिमिटेड आणि सेवासहयोग फाऊंडेशन चा सी.एस.आर. मार्फत शालेयउपयोगी साहित्य वाटप.
पिंपरी चिंचवड :
दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी प्रीकॉल लिमिटेड फुलगाव त्यांचे सी.एस.आर.फंडातून आणि सेवा सहयोग फाऊंडेशन यांचे मार्फत पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शालेयउपयोगी साहित्यामध्ये स्कूल बॅग,वह्या,पुस्तके,कंपास आणि तेलखडू अशा विविध शालेयउपयोगी वस्तूंचे वाटप जिल्हा परिषद केंद्रशाळा किवळे आणि कडवस्ती येथील शिकत असलेल्या एकूण 191 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रीकॉल कंपनीचे प्लांट हेड आदित्य सहस्रबुद्धे, एच आर संतोष भोसले, मनोज महाजन तसेच सेवा सहयोग चे मकरंद सातभाई, जय जाबरे, तानाजी उफाडे, केंद्रप्रमुख रेटवडे सर, विस्तार अधिकारी जंगले साहेब, किवळे गावचे सरपंच जया कड,स्वाती कदम,बाळासाहेब साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते. किवळे गावचे युवा कार्यकर्ते स्वप्नील बाळासाहेब साळुंके यांचा प्रयत्नातून हे साहित्य उपलब्ध झाले. ह्या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष किवळे सुनील साळुंके,कडवस्ती संदीप कड,सागर साळुंके, संदीप चौधरी,संतोष म्हसे,लहू म्हसे, अमोल राऊत,विजय कदम,नितीन कडुसकर,साहेबराव लिंबळे, संजय कदम,अमोल शिवले, रवी गुरव, बाळासाहेब म्हसे आणि शाळा व्यवस्थापन समिती किवळे कडवस्ती चे सर्व पदाधिकरी यांनी कष्ट घेतले.
सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आदित्य सहस्रबुद्धे, मकरंद सातभाई आणि जय जबरे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राळे मॅडम आणि आभार स्वप्नील साळुंके यांनी मानले.