गांजा तस्करी प्रकरणी आरोपींना जामीन… Adv. सुधीर पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य..
पुणे :
अमली पदार्थ विरोधी पथकाने 12 जानेवारी 2024 रोजी गांजा विक्री प्रकरणी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रुचून रावेत येथे कृष्णा शिंदे,अक्षय मोरे व हनुमंत कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यां तिघांकडून 25 लाख 69 हजार 100 रुपये किमतीचा 25 किलो गांजा जप्त केला होता. त्यांनी हा गांजा डूकळे यांच्याकडून आणला होता व तो सौरभ निर्मळ याला विकणार असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानुसार पोलिसांनी डुकळे याला ताब्यात घेऊन ज्या संशयित रुग्णवाहिकेतून गांजा वाहतूक करत होते त्या दोन्ही रुग्णवाहिका पोलिसांनी ताब्यात घेतल्या. यातील डूकळे यांच्याकडून 50 लाख 20 हजार रुपये किमतीचा 50 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त केला होता.
यातील सर्वांवर गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आला .
सदर गुन्ह्यातील हनुमंत कदम यांच्या वतीने अॅड.विशाल आबासाहेब वीरपाटील यांनी जामीन अर्ज दाखल केला. सदर जामीन अर्जावर युक्तिवाद करताना अनिवार्य अनुपालनचे पूर्तता केली नाही. तपास पूर्ण झाला असून कस्टडीची आवश्यकता नसल्याचे तसेच इतर बाबीवंर युक्तिवाद करण्यात आला.
सरकारी वकिलांनी युक्तिवाद करत असताना गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. सदर जप्त गांजा हा व्यावसायिक कारणासाठी मोठ्या प्रमाणमध्ये आहे. सदर आरोपीवर यापूर्वीचे गुन्हे आहेत असे सांगत जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद केला.
यावर आरोपींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे मेहरबान न्यायालयात दाखल करत त्यावर आधारित युक्तिवाद केला.
दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून माननीय .न्यायालयाने अॅड.सुधीर पाटील व अॅड.विशाल वीर पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीचा जामीनअर्ज विविध अटी शर्तीवर मंजूर करण्यात आला.
अॅड.विशाल वीर पाटील यांना युक्तिवाद तसेच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय न्यायनिवाडा या न्यायालयीन कामासाठी सीनियर वकील अॅड.सुधीर पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच यासाठी अॅड.अतुल निंबळे, अॅड.अर्जुन वाघमारे,अॅड.ओंकार पुजारी यांनी सहकार्य केले.