स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य व स्वराज्य रक्षक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वराज्य राज्यस्तरीय आदर्श सरपंच व विविध अंगी सन्मान सोहळा 2024 निगडी प्राधिकरण ग दि माडगूळकर नाट्यगृह या ठिकाणी मोठ्या थाटामाटात संपन्न
पिंपरी चिंचवड –
दिनांक 30 ऑगस्ट वार शुक्रवार रोजी स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य व स्वराज्य रक्षक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वराज्य राज्यस्तरीय आदर्श सरपंच व विविध अंगी सन्मान सोहळा 2024 निगडी प्राधिकरण ग दि माडगूळकर नाट्यगृह या ठिकाणी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या सोहळ्याच्या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून हे उपस्थित होते महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरपंचाची आदर्श सरपंच म्हणून निवड करण्यात आली होती यावेळी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष अशोक बाजीराव ओव्हाळ यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. व त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्याख्यात्या समाज प्रबोधनकार सौ. शारदाताई मुंडे यांनी सर्वांना मार्गदर्शन करत आपल्या अमोघ वक्तृत्वाने सर्वांची मने जिंकत कार्यक्रमाला सुरुवात केली. सन्माननीय मान्यवरांचा सन्मान व स्वागत झाल्यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे सविता दगडे यांनी सरपंचांना मार्गदर्शन केले. व सन्मान सोहळ्याला सुरुवात करत महाराष्ट्रातून आलेल्या 51 सरपंच बंधू आणि भगिनींना आदर्श सरपंच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खूप मोठ्या संख्येने यावेळी कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून सरपंचांबरोबर आलेले त्यांचे ग्रामस्थ उपस्थित होते यासह आंतरराष्ट्रीय व्याख्यात्या सौ शारदाताई मुंडे, माजी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष सविताताई दगडे, उद्योगपती काळूरामशेठ बारणे ,पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेविका सौ मायाताई संतोष बारणे ,स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, पै .बाळासाहेब घोटकुले माजी जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा पुणे,अध्यक्ष रोटरी क्लब थेरगाव दत्तात्रय कसाळे, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, अरुण( नाना )कांबळे संपादक पावना समाचार ,शिवाजीराव बुचडे पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मुळशी, दादाराम मांडेकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मुळशी ,विजय सिंह नलावडे डेप्युटी सीईओ पुणे, गंगाराम मातेरे मुळशी तालुका काँग्रेस अध्यक्ष ,बाबासाहेब पावसे पाटील सरपंच संघटित चळवळीचे नेते, अमोल दादा कलाटे भाजपा नेते, अशोक बाजीराव ओव्हाळ पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष, गाडे साहेब, रोहित संजय पवार अध्यक्ष स्वराज्य सरपंच सेवा संघ, मीनाताई मांडेकर, मयुरीताई मांडेकर, ह्यूमन राइट्स चे अध्यक्ष संदीप कोरी, सुदेश राजे , पुंडलिक शेठ मांडेकर,व विविध दैनिक पोर्टल व यूट्यूब चैनल चे संपादक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन हे सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी अमोल शेवाळे संपर्कप्रमुख स्वराज्य रक्षक न्यूज चे उपसंपादक रमेश साठे यांनी केले तरी या सुंदरशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराज्य रक्षक न्यूज चे संपादक प्रा सोमराज नाडे यांनी केले. कार्यक्रमानंतर आदर्श सरपंच व विविध अंगी सन्मान प्राप्त करणाऱ्या सर्व मान्यवर सन्माननीय यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच उमेद व आनंद होता. मानकर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा या अनुषंगाने हा सोहळा उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तींच्या पाठीवरती थाप टाकणारा व पुरस्कार प्रेरणा देतात प्रेरणेतून कार्य घडते व कार्यातून समाज उभा राहतो या समाज हिताच्या भावनेने हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मदत करणाऱ्या सर्वांचेच आभार मानण्यात आले.