*बारावीच्या बोर्ड परीक्षेत इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश विज्ञान विभागात मावळ तालुक्यात इंद्रायणी महाविद्यालयाचा आदर्श रामसिंग वर्मा हा विद्यार्थी प्रथम
तळेगाव दाभाडे :

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या, इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्वच विभागांमध्ये मुलींनी निकालाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल खालील प्रमाणे –
*विज्ञान विभाग*
एकूण निकाल 98.95%
प्रथम क्रमांक -आदर्श रामसिंग वर्मा 94.33%
द्वितीय क्रमांक – ओजस्वी हर्षल छाजेड 92.50%
तृतीय क्रमांक- अनुष्का रामचंद्र जाधव 91.50%
*कला विभाग*
एकूण निकाल 91.50%
प्रथम क्रमांक – रुपेश श्रावण आगलावे 82.17%
द्वितीय क्रमांक – सुषमा हनुमंत मोहरुले 80.33%
तृतीय क्रमांक – वैष्णवी संजय शेळके 72.17%
*वाणिज्य विभाग*
एकूण निकाल 90.93%
प्रथम क्रमांक – राधिका राजेश कामनवार 92.33%
द्वितीय क्रमांक – प्रणाली भरत गाडे 91.33%
तृतीय क्रमांक- हर्षदा समीर शिंदे 85.33%
*तंत्र शिक्षण विभाग*
एकूण निकाल 96.55%
प्रथम क्रमांक कार्तिक प्रवीण बुचडे 65.17%
द्वितीय क्रमांक सक्षम दिपक साळवे 60.83%
तृतीय क्रमांक केतन नंदू कानपिळे 59.00%
तसेच यावर्षी भूगोल, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे, संस्थेचे कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे तसेच इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे ,उपप्राचार्य संदीप भोसले सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी अभिनंदन केले आहे. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच बारावीनंतरच्या प्रथम वर्ष कला ,वाणिज्य ,विज्ञान, फार्मसी, इंजिनिअरिंग कॉलेज बीएससी कॉम्प्युटर सायन्स, बी बी ए ,बी सी ए, सर्व विभागांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असून विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत असे आवाहन देखील करण्यात आले आहे.






