*स्काऊट गाईड पथकाचा लोहगडावर ट्रेक*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे मस्करनेस कॉलनी येथील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल चे विद्यार्थी आणि शिक्षक स्काऊट गाईड पथकाचा एक उपक्रम केला.महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स अँड गाईड्स पुणे यांच्यामार्फत एक दिवसाची पावसाळी सहल जागतिक वारसा असलेल्या लोहगड किल्ल्यावर आयोजित करण्यात आली होती. या सहलीमध्ये सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्यांना जागतिक वारसामध्ये गणण्यात आल्यानंतर त्यातीलच एक लोहगड किल्ला मुलांना माहिती व्हावी व आजच्या युगामध्ये इतिहास हा मुलांना जवळून पाहण्यास मिळावा तसेच किल्ल्याचे संवर्धन आणि रक्षण करणं किती महत्त्वाचा आहे हे मूल्य रुजवण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यात आला.या लोहगड किल्ल्याच्या हाईक मध्ये पुणे जिल्ह्यातील जवळपास पंधरा शाळांनी सहभाग घेतला होता.

भटकंतीची सर्व तयारी केली गेली. योग्य ट्रेकिंग शूज, पावसाळ्याचे कपडे, पाण्याच्या बाटल्या आणि घरून बनवलेले अन्न घेऊन निघाले.

Advertisement

गडावर चढताना मार्गदर्शक शिक्षकांनी किल्ल्याचा इतिहास सांगितला.गडावर पोहोचल्यानंतर आम्ही सर्वांनी विंचूकाट्यावर फोटो काढले. ही शेपटीसारखी रचना खूपच सुंदर वाटली.

गडावर असलेली पाण्याची टाकी, शिवमंदिर आणि धान्याचे कोठार पाहून इतिहास जिवंत झाला.

 

पावसामुळे सगळीकडे हिरवळ, धुके, आणि झुळझुळ वाहणारे झरे पाहायला मिळाले. काही ठिकाणी रंगीबेरंगी फुलं आणि सह्याद्रीतील दुर्मिळ पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळाले.ही किल्ल्यावरची भटकंती मुलांसाठी एक अविस्मरणीय अनुभव होता.भटकंतीमुळे शारीरिक व्यायाम, संघभावना आणि नवीन ठिकाणे पाहण्याची जिज्ञासा निर्माण झाली. या सहलीमध्ये इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी यशश्री आलम व ऋतुजा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भटकंतीचा अनुभव घेतला.लोहगड किल्ल्याची ही सहल शैक्षणिक व प्रेरणादायक ठरली. अशा जागतिक वारसा स्थळांना भेट देणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि निसर्गाचा गौरव अनुभवणे होय.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page