महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी च्या वतीने सिंधी भाषेतील “ओ माय झुलेलाल” या दृकश्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पिंपरी चिंचवड :
दिनांक ६ फेब्रुवारी मंगळवारी सायंकाळी एलप्रो माॅल येथील सभागृहात महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी च्या वतीने सिंधी भाषेतील “ओ माय झुलेलाल” या दृकश्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या मधे सिंधी समाजातील जो खुप गरीब समाज आहे त्या गरीबीचा फायदा घेऊन कशा प्रकारे धर्मांतर करणे चालू आहे आणि ते कशा प्रकारे थांबले पाहिजे, समाजातील तरूण तरूणींन मधे लग्ना नंतर घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढत असल्याने ते कशा पद्धतीने कमी करण्यासाठी समाजाने प्रयत्न केला पाहिजे हे दाखवून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न या दृकश्राव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखविण्याचा अतिशय योग्य पध्दतीने दाखविले आहे या दृकश्राव्य कार्यक्रमाचे लिखाण निखील राजपाल आणि दिग्दर्शन ज्युली तेजवानी यांनी केले आहे या वेळी ज्युली तेजवानी यांचा मान्यवरांच्या हस्ते विषेष गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास सिंधी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या वेळी महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी चे कार्याध्यक्ष महेश सुखराणी, अखिल भारतीय सिंधू सभा या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष लाधाराम नागवानी,राम जेवरानी चेअरमन सहयोग फाऊंडेशन आणि सदस्य नॅशनल काॅनसिल सिंधि भाषा दिल्ली सुरेश हेमनानी अध्यक्ष भारतीय सिंधू सभा , सेंट्रल पंचायत या संस्थेचे कार्याध्यक्ष गोपीचंद आसवानी, तसेच सदस्य महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी मनोहर जेठवानी,वनिता बसंतानी, दामोदर भतिजा,मदन जसवानी, विनोद तलरेजा,विरू दुलानी, संध्या कुंदनानी सुरेश कुंदनानी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जवाहर कोटवानी प्रियदर्शनी सोशल ग्रुप, परमानंद जमतानी जमतानी ग्रुप,सिंधू सखा संगम सेंट्रल पंचायत आदी संस्थांनी बहुमोल मदत केली पिंपरी येथील सेंट्रल पंचायत चे अजित कंजवानी, तुलसीराम तलरेजा, श्रीचंद नागरानी,मनोज पंजाबी,हिरा रिझवानी, सुरिंदर मंघनानी,राम आसवानी आदी उपस्थित होते