ॲड्.पु वा. परांजपे विद्या मंदिरामध्ये रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या सौजन्याने “शाळा सुधार विकास” प्रकल्पांतर्गत सेन्साटा टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सी.एस.आर.फंडातून उभारण्यात आलेल्या मुलींचे स्वच्छतागृह व कोनशिला अनावरण समारंभ संपन्न

तळेगाव दाभाडे :

शनिवार दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी ॲड्.पु वा. परांजपे विद्या मंदिरामध्ये रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या सौजन्याने “शाळा सुधार विकास” प्रकल्पांतर्गत सेन्साटा टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सी.एस.आर.फंडातून उभारण्यात आलेल्या मुलींचे स्वच्छतागृह व कोनशिला अनावरण समारंभास परदेशी पाहुणे कॅरेन असदोरियन व्ही.पी, गिर्बिट रोक्स टर्बोंनसन मानव संसाधन संचालक, श्री.सतीश बोरोळे संचालक व्यवसाय प्रमुख, श्री .योगेश पवार प्रमुख इंडिया टेक सेंटर , श्री.चैतन्य कुलकर्णी व्यवस्थापक ,अपर्णा दिवेकर एच् आर मॅनेजर इंडिया ,रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे उपाध्यक्ष श्री.कमलेश कार्ले साहेब व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकुशल सचिव श्री. संतोषजी खांडगे साहेब , सहसचिव व ॲड्.पु.वा. परांजपे विद्यामंदिर शालेय समिती अध्यक्ष श्री. नंदकुमार शेलार साहेब, खजिनदार श्री राजेशजी म्हस्के ,ज्येष्ठ संचालक श्री. यादवेंद्र खळदे साहेब,रो. श्रीशैल मेंथे,श्री.अशोक काळोखे , विश्वनाथ मराठे ,महेश महाजन, राजेंद्र पोळ ,जयंत देशपांडे ,मंगेश गारोळे, राजू गोडबोले, देवेंद्र कदम, प्रभाकर निकम, अतुल हंपे,प्रमोद दाभाडे, अविनाश धेंडे ,निलेश वाकचौडे,अरुण सोनवणे, चेतन नामजोशी, धनंजय माथुरे ,आनंद असवले साहेब उपस्थित होते .

Advertisement

 

संस्थेतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शाळेतील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलींच्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन, कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड् .पु.वा.परांजपे विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री. पांडुरंग पोटे सर यांनी केले. कॅरेन असदोरियन यांनी आपल्या मनोगतातून शालेय परिसर , स्वच्छता, भारतीय संस्कृती व येथील शैक्षणिक वातावरण पाहून आनंदित झाल्याचे नमूद केले. सर्व प्रमुख पाहुण्यांनी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा ऐतिहासिक वारसा समजून घेऊन संस्थेची प्रशंसा केली. श्री. कमलेश कार्ले साहेब यांनी आपल्या मनोगतातून रोटरी क्लब करत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली भविष्यात देखील मुलांचे स्वच्छतागृह बांधून देण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षीय भाषणातून नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव श्री. संतोषजी खांडगे साहेब यांनी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष श्री उद्धव चितळे यांच्या प्रयत्नातून शाळेसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व सेन्साटा टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक कौतुक करून विद्यार्थ्यांच्या भौतिक सोयी सुविधांसाठी अशाच प्रकारचे सहकार्य नेहमीच लाभत असते असे आवर्जून नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुवर्णा काळडोके यांनी तर आभार प्रदर्शन प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. कमल ढमढेरे मॅडम यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page