*सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षकांच्या आरोग्यजागृतीवर मार्गदर्शन*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षकांच्या आरोग्यजागृतीसाठी एक उपयुक्त उपक्रम राबविण्यात आला. युनिकेअर हेल्थ सेंटर यांच्या सहकार्याने शाळेत आरोग्य जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Advertisement

कार्यक्रमात तज्ञांनी शिक्षकांना दैनंदिन जीवनातील आरोग्याची काळजी कशी घ्यावी, ताण-तणाव व्यवस्थापन, योग्य आहार, व्यायाम व मानसिक स्वास्थ्य याबद्दल मार्गदर्शन केले. शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.

शाळेच्या व्यवस्थापनाने अशा उपक्रमांमुळे शिक्षकांचे आरोग्य सुदृढ राहून विद्यार्थ्यांपर्यंत सकारात्मक ऊर्जा पोहोचते, असे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले असून सर्वांनी याचे कौतुक केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page