गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ*
सोलापूर धाराशिव मावळ मित्र मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव बालविकास विद्यालय तळेगाव दाभाडे येथील हॉलमध्ये संपन्न झाला.
कुमारी दिशा विलास केमदारणे व कुमारी वेदांगी नारायण आसवले यांनी *सीएची* पदवी तसेच पैलवान सनम समीर शेख हिने *महिला मावळ केसरी किताब* पटकवल्यामुळे गौरवचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व बुके देऊन पाहुण्यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष सेवानिवृत्त आरटीओ माननीय हरिश्चंद्रजी गडसिंग साहेब म्हणाले *आमचे मंडळ गेले 23 वर्षे सामाजिक बांधिलकी जपत असे विविध कार्यक्रम करत आहे.*
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री किशोर राजस सचिव स्नेहवर्धक मंडळ व श्री राजेंद्र म्हाळस्कर अध्यक्ष रमेश कुमार सहानी स्कूल वडगाव हे उपस्थित होते.
किशोर राजस यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले व गुणवंत विद्यार्थी व त्यांची कुटुंबीय यांनी घेतलेल्या कष्टाची नोंद घेऊन त्यांना पुढील कार्यासाठी खूप सा-या शुभेच्छा दिल्या.
सोलापूर धाराशिव मित्र मंडळाचे संस्थापक सचिव श्री रामराव जगदाळे यांनी मंडळाचा उद्देश आणि कार्य सांगितले.
कार्यक्रमासाठी मंडळाचे उपाध्यक्ष श्री अरुण वाघमारे, खजिनदार रोहन पंडित, म. न.शेख, सिताराम गडसिंग, नारायण आसवले दिलीप कदम ,हेमंत गडसिंग, प्यारेलाल शेख , महेश निंबाळकर इत्यादी उपस्थित होते.
ईश्वर ढगे, मनोजकुमार क्षिरसागर, मनोहर खुणे, श्री राहुल सुरवसे इत्यादींनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री वशिष्ठ गटकळ यांनी केले सूत्रसंचालन श्री बापूराव नवले यांनी केले तर आभार दत्तात्रय जाधव यांनी मानले.
प्यारेलाल शेख सरांच्या सुमधुर गीताने व चहा नाष्टा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.