सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पौगंडावस्था व मासिक पाळी आरोग्य कार्यशाळा संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थिनींसाठी पौगंडावस्था व मासिक पाळी आरोग्य या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा राइटसाइड स्टोरी यांच्या मार्गदर्शनाखाली तर व्हिस्पर इंडिया यांच्या विशेष सहकार्याने पार पडली. इयत्ता ७वी ते १०वी च्या विद्यार्थिनी या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या.

Advertisement

कार्यशाळेत मुलींना शारीरिक आणि मानसिक बदलांची माहिती, मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची स्वच्छता, योग्य सॅनिटरी उत्पादने निवडण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर समजावून सांगण्यात आले. तज्ज्ञांनी विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करून त्यांना योग्य माहिती मिळवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

शाळेच्या समन्व्यक आणि प्राथमिक विभाग प्रमुख जयश्री जोशी यांनी अशा उपक्रमांमुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना निरोगी जीवनशैलीची जाणीव होते असे सांगितले. विद्यार्थिनींनीही अशा कार्यशाळांची गरज आणि उपयुक्तता व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

शाळेत आयोजित ही कार्यशाळा अत्यंत माहितीपूर्ण व उपयुक्त ठरली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page