*मस्करनेस कॉलनी नंबर २ मधील विस्कळीत पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त: आंदोलनाचा इशारा*
तळेगाव दाभाडे:
मस्करनेस कॉलनी नंबर २ मध्ये मागील अनेक दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून विस्कळीत पाणीपुरवठ्याने
येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांवर टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. नगरपरिषदेने नागरिकांना अवाजवी पाणीबील पाठविण्यात आले आहे. येत्या सोमवारपर्यंत
नियमित पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर मंगळवारी (दि.१८) नगरपालिकेच्या कार्यालयासमोर कॉलनीतील सर्व रहिवाशी आपल्या कुटुंबासहित आंदोलन
करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अरुण माने,
चारुशीला काटे,दिपाली चव्हाण ,शुभांगी भेगडे
स्वाती चव्हाण ,आर्या गुरुवे ,
वर्षा पाटील ,
अनिता भेगडे ,
विना ठाकूरदेसाई ,
सविता ठाकूरदेसाई ,
स्मिता नारकर ,
स्नेहा राजकुमार ,
स्वाती चव्हाण ,
सुलोचना चव्हाण ,
नंदकिशोर पटेल ,
संदेश मोरे ,
महादेव पवार ,
विक्रम पाटील ,
विश्वनाथ चव्हाण ,
विलास गायकवाड आदी उपस्थित होते.
_________________________
प्रमुख मागण्या:
पाणी नियमित , वेळेवर आणि प्रेशरने मिळावे. वाढीव आलेली पाणीपट्टी कमी करून मिळावी.
जोपर्यंत पाणी नियमित येणार नाही तोपर्यंत नगरपालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. टँकरद्वारे घेतलेल्या पाण्याचे बिल पाणीपट्टी बिलातून कमी करण्यात यावे
____________________
पाण्यासारख्या गंभीर विषयाकडे नगरपरिषद प्रशासनाने जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.
येत्या १७ तारखेपर्यंत पाणीपुरवठा व्यवस्थित
सुरू झाला नाही तर १८तारखेला नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल.
*अरुण माने*
माजी नगरसेवक