पिंपरी विधानसभा क्षेत्राचा अनुशेष भरून काढा – आ. उमाताई खापरे भाजपा शिष्ट मंडळाची पिंपरीतील विकास कामांसाठी विशेष तरतूद करण्याची मागणी

SHARE NOW

पिंपरी, पुणे (दि. १५ फेब्रुवारी २०२५) शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून पिंपरी विधानसभा क्षेत्र ओळखले जाते. मागील अनेक वर्षांपासून पिंपरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचा अनुशेष बाकी आहे, तो भरून काढण्यासाठी पुढील अर्थसंकल्पात मनपा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी विशेष तरतूद करावी अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी केली आहे.

शनिवारी (दि.१५) पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनात आयुक्त सिंह यांच्या समवेत आ. उमाताई खापरे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी विधानसभा क्षेत्रातील भाजपाच्या शिष्टमंडळासमवेत बैठक घेण्यात आली.

यावेळी प्रभाग क्रमांक १९ मधील नाले विकसित करणे, प्रभाग क्रमांक १० सह पिंपरी विधानसभा क्षेत्रातील सातही प्रभागांमधील मधील प्रलंबित कामे मार्गी लावणे, मेट्रोलगत पार्किंग साठी केलेले आरक्षण विकसित करणे, खराळवाडी येथील मैदानाचे व व्यायाम शाळेचे आरक्षण विकसित करणे, वाल्मिकी चौक ते यशोपुरम चौक मार्गावर अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट अंतर्गत विकास करणे, आवश्यक ते रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणे उदाहरणार्थ वल्लभ नगर ते महेश नगर, महेश नगर ते एच. ए. पेट्रोल पंप रस्ता सिमेंट काँक्रीटचा करणे, पिंपरी विधानसभा परिसरातील पाणी प्रश्न सोडविणे, आवश्यक तेथे नालाबंडिंग करणे, अहिंसा चौक सुशोभीकरण करणे, ऑक्सिजन पार्क मध्ये विरंगुळा केंद्र उभारणे तसेच पिंपरी विधान परिसरात असणाऱ्या झोपडपट्ट्यांचा एसआरए अंतर्गत विकास करणे व सुरू असणारे प्रकल्पांना गती देणे आणि एसआरए लाभार्थ्यांच्या तक्रारी समजून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष उभारणे

Advertisement

आवश्यक आहे अशीही मागणी या बैठकीत करण्यात आली व तसे पत्र आयुक्त सिंह यांना देण्यात आले.

यावेळी महापालिकेतील विविध विभागाचे अधिकारी व प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश कार्यकरणी सदस्य सदाशिव खाडे, महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्ष अनुप मोरे, माजी उपमहापौर केशव घोळवे, तुषार हिंगे, माजी नगरसेविका शैलजा मोरे, शर्मिला बाबर, जयश्री गावडे, क्रीडा प्रकोष्ठ जयदीप खापरे, , माजी नगरसेवक माऊली थोरात, राजू दुर्गे तसेच संजय मंगोडेकर, नरेंद्र आमले, राजेंद्र बाबर, विशाल वाळूंजकर, गणेश ढाकणे, गोपाल केसवाणी, कैलास कुटे, सतीश नागरगोजे, जयदेव डेबरा, मंगेश धाडगे, राहुल खाडे, अजित लिगाडे, नीता कुशहारे, संजय मंगोडेकर, नंदू भोगले, समीर जवळकर, सलीम शिकलगार, गणेश वाळूंजकर, संतोष टोणगे उपस्थित होते.

—————————————————————


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page