*स्वामी विवेकानंद स्कूल मध्ये बलिदान देणाऱ्यांना मानवंदना*
तळेगाव दाभाडे :
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद स्कूल मध्ये ध्वजारोहण उत्साहात साजरे झाले.यावेळी प्रमुख पाहुणे रोटरी क्लब आॕफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष आणि श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद शेलार, संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे,शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे,उपाध्यक्ष दादासाहेब उर्हे ,कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, संचालक विलास काळोखे,रामराव जगदाळे,मुख्याध्यापक रावसाहेब शिरसट, जयश्री जोशी,राजेंद्र पंडीत,सचिन कोळवणकर, विल्सेन सालेर,दशरथ जांभूळकर,संदीप मगर, आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर करून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना मानवंदना दिली.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वक्तृत्व, गीत गायन, देशभक्तीपर गीते, नाटक, कवायत, विविध नेत्यांच्या वेशभूषा द्वारे व्यक्तिमत्व परिचय याविषयी समर्पक माहिती विद्यार्थ्यांनी सादर केली.
इयत्ता दहावी मधील कु.सुरक्षा कटरे,सातवी मधील कु.अथर्व सलागरे,कु.मानसी राऊत या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी वक्तृत्व सादर केले.
विकसित भारत,स्वतंत्र भारत याबाबतचे विचार आपल्या मनोगतातून शिक्षिका सुजाता गुंजाळ यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रो मिलिंद शेलार यांनी चारित्र्यसंपन्न व चारित्र्यशील विद्यार्थी घडावे याकरिता मार्गदर्शन केले . देशाचे उज्वल भविष्य असणा-या विद्यार्थ्यांनी समता,बंधुता,एकता जपून प्रगत,समृद्ध,शांत भारत घडविण्याचा संकल्प करावा असे मत त्यांनी व्यक्त केले.
संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहत त्यांचे बलिदान वाया जाऊ न देता आपल्या देशाला आपण महासत्ता बनवू, विद्यार्थ्यांनी ज्ञान अर्जित करून स्वविकासा बरोबर देश विकास घडवावा याकरिता मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्य केले जाईल असे सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक रावसाहेब सिरसट,पर्यवेक्षिका रेणू शर्मा,धन सुजाता गुंजाळ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.या सूत्रसंचाल धनश्री पाटील यांनी केले.