“प्लास्टिकमुक्त भविष्यासाठी रोटरी क्लबचा उपक्रम – विद्यार्थ्यांना लघुपटातून जनजागृती”

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष रो. संतोषजी खांडगे यांच्या विशेष सहकार्याने, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टीन यांच्या संयुक्त विद्यमाने “प्लास्टिकचे दुष्परिणाम” या विषयावर लघुपटाद्वारे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा उपक्रम कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे यांच्या स्मरणार्थ राबविण्यात येत असून, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे येथे गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे उद्‌घाटन तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी मा. शिल्पा रोडगे मॅडम यांच्या शुभहस्ते होणार आहे.

Advertisement

लघुपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर तळेगाव शहरातील इतर शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या सोयीप्रमाणे हा लघुपट दाखविण्यात येईल.

या उपक्रमासाठी रो. प्रवीण भोसले (अध्यक्ष 25-26) आणि रो. संदीप मगर (सेक्रेटरी 25-26) यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page