“रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व लोटस कॉम्प्युटरचा उपक्रम – दहावीतील १२५ विद्यार्थ्यांना ‘आयडिअल स्टडी ॲप’चे विनामूल्य वाटप”

SHARE NOW

इंदोरी :

प्रगती विद्या मंदिर व ह.भ.प. आ. ना. काशीद पाटील ज्युनिअर कॉलेज, इंदोरी येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व लोटस कॉम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीतील १२५ विद्यार्थ्यांना आयडिअल स्टडी ॲप विनामूल्य देण्यात आले. संस्थापक अध्यक्ष रो. संतोषजी खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

 

या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष रो. प्रविण भोसले, सचिव रो. संदीप मगर, उपप्रांपाल रो. विन्सेंट सालेर, सहप्रकल्प प्रमुख रो. पांडुरंग पोटे, रो. दशरथ जांभूळकर, रो. अजय पाटील, रो. सचिन कोळवणकर, रो. दिपक बागल तसेच प्राचार्य महादेव ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

 

कार्यक्रमाचे स्वागत व सुत्रसंचालन दहावी ‘ब’चे वर्गशिक्षक रो. लक्ष्मण मखर यांनी केले. अध्यक्ष रो. प्रविण भोसले यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्प प्रमुख व सचिव रो. संदीप मगर यांनी स्टडी ॲपचे महत्त्व सांगून ते नियमितपणे वापरण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना या ॲपमुळे अभ्यासात निश्चितच चांगली दिशा मिळेल, असे मत व्यक्त करण्यात आले.

प्राचार्य महादेव ढाकणे यांनी आभार प्रदर्शन करताना प्रशालेच्या भौतिक सुविधांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शेवटी नारळाचे झाड लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्गशिक्षक विकास दगडे, सौ. संध्या कांबळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page