बालविकास विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा साजरा.
तळेगाव दाभाडे.

स्नेहवर्धक मंडळ सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या बालविकास विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा जल्लोषात उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. दिनांक 20डिसें ,22डिसें व 23डिसेंबर 2025या तीन दिवसात विज्ञान व चित्रकला -हस्तकला प्रदर्शन, आनंद बाजार, पूर्व प्राथमिक विभाग प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, ज्युनियर कॉलेज, व बी.एड कॉलेज यांचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले .
दिनांक 20 डिसेंबर 2025रोजी सायंकाळी5.00वा संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुभाष खळदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून कार्यक्रमास सुरुवात झाली . विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही विज्ञान प्रदर्शन व चित्रकला हस्तकला प्रदर्शन तसेच आनंद बाजार यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे छोटी दुकाने लावून खरेदी-विक्री , सांघिक कार्य , व्यवहारक्षमता या सर्वांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये व्हावा तसेच त्याचा आनंद घेता यावा म्हणून आनंद बाजाराचे आयोजन केले जाते. विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी स्वयंचलित प्रात्यक्षिक, इलेक्ट्रिक प्रयोग ,वैज्ञानिक उपक्रम सादर केले होते. हस्तकला व चित्रकला प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मधुबनी पेंटिंग वॉल हैंगिंग ,पोस्टर्स, स्केच, क्ले मेकिंग , रांगोळी अनेक कलाकृती प्रदर्शित केल्या होत्या. विद्यार्थी, पालक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनीच याचा आनंद घेतला. हे प्रदर्शन पार पाडण्यासाठी कलाशिक्षक सौ. श्रद्धा क्षीरसागर सौ.सायली चासकर , विज्ञान शिक्षिका सौ. नीलांबरी महाजन , सौ. भक्ती शेंडे. सौ. तेजस्विनी शिंदे, दिव्या भारती यांचे विशेष सहकार्य लाभले .

दिनांक 22 डिसेंबर 2025 पूर्व प्राथमिक विभाग व प्राथमिक विभाग यांचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शिल्पा रोडगे (block education officer taluka maval) हे उपस्थित होते. अध्यक्ष भाषणात .अनुभव व कथा यांच्या माध्यमातून कौतुक करत मार्गदर्शन केले.
पूर्व प्राथमिक विभाग व प्राथमिक विभाग यांनी जुना नवा संगम(retro to metro) या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर केले. विविध जुनी आणि नव्या गीतांचा यामध्ये समावेश होता . कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन छोट्या विद्यार्थ्यांनी सुंदरपणे केले.पालक व विद्यार्थी यांनी यामध्ये उस्फूर्त सहभाग दर्शविला.
कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सौ .वंदना भोळे यांनी केले , मुख्याध्यापिका सौ .नूतन कांबळे यांनी वार्षिक अहवाल सादर केला .सूत्रसंचालन शिक्षिका सौ. प्रियांका बोरकर व सौ. शैला पवार,आभार सौ. अमृता देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी यात विशेष सहभाग दर्शविला.
23 डिसेंबर 2025रोजी सायंकाळी चार वाजता माध्यमिक विभाग ज्युनिअर कॉलेज आणि बी.एड कॉलेज यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात पार पडले श्री. साहेबराव पाटील (Principal Yashoda Mahadev Kakade College of engineering), डॉ .संभाजी मलगे (principal indrayani mahavidyalay Talegaon dabhade) प्रमुख अतिथी म्हणून बोलाविण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यालयाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री .दीपक खटावकर व स्वागत पर्यवेक्षक श्री .सागर केंजुर, यांनी केले. मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे यांनी माध्यमिक व ज्यू . कॉलेज चा वार्षिक अहवाल सादर केला, तर बी. एड. कॉलेज मुख्याध्यापिका सौ.पल्लवी वर्तक यांनी त्यांचा वार्षिक अहवाल सादर केला.
ग्लोबल इंडिया जागतिकीकरण या संकल्पनेवर आधारित गीतांवर नृत्य सादरीकरण करण्यात आले . गणेश वंदना ,शिववंदना, याने कार्यक्रमाची सुरुवात करून नंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. यामध्ये हिंदी मराठी भाषेतील नाटक यांचाही समावेश करण्यात आला होता . कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग दर्शवून कार्यक्रम यशस्वी केला.
वार्षिक स्नेहसंमेलनातच विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले त्यामध्ये पूर्व प्राथमिक विभाग –
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी-
1) विद्युत प्रथमेश सावंत
2) शिवम गणेश जाधव
3) युवा संदीप महाजन
4) अथर्व तुषार जाधव
5) मंजिरी राहुल वाचकल (सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक विभाग)
सर्वोत्कृष्ट वर्ग नर्सरी वर्गशिक्षिका-सौ अश्विनी आंबेटकर.
प्राथमिक विभाग-
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी-
1) सेजल जाधव
2) अद्वैता कुलकर्णी (सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक विभाग)
4)सर्वोत्कृष्ट वर्ग- तिसरी -(ड) वर्गशिक्षिका सौ. शामल कुडके
5) विद्यालय सांस्कृतिक विभाग चषक -ब्लू हाऊस
माध्यमिक विभाग- 1)सर्वोत्कृष्ट विद्यार्थी-कु इंगवले धनवी
2) कु गोगटे निरंजन(सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक विभाग)
3) सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रतिनिधी-कु भिडे अन्वय.
4) सर्वोत्कृष्ट वर्ग (5वी ते 7वी)- इयत्ता सहावी ब वर्गशिक्षिका दिव्या भारती .
5) सर्वोत्कृष्ट वर्ग ( इयत्ता 8वी ते 10वी)-वर्ग इयत्ता 8वी ब वर्गशिक्षिका सौ सायली कोऱ्हाळे .
6) प्रश्नमंजुषा स्पर्धा-ब्लू हाऊस
7) विद्यालय सांस्कृतिक विभाग चषक-ग्रीन हाऊस.
ज्यू कॉलेज – सर्वोत्कृष्ट विद्यार्थी –
1) जोशी पूर्वेश (Sci. )
2) ठाकूरद्वारे नेहा (Com.)
3) मंडल ईशा ( सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक विभाग)
सांस्कृतिक विभाग चषक- चावला हाऊस
प्रमुख पाहुणे पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष श्री .चंद्रकांत शेटे ,उपाध्यक्ष श्री. सुभाष खळदे, सचिव श्री .किशोर राजस खजिनदार श्री. सुनील कडोलकर संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, श्री. सुनील कडोलकर, श्री .शिवाजीराव आगळे इत्यादी उपस्थित होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .नूतन कांबळे , बी.एड.कॉलेज मुख्याध्यापिका सौ. पल्लवी वर्तक, कार्यालयीन अधीक्षक सौ .सुजाता कुलकर्णी,सर्व विभाग पर्यवेक्षक,सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन सोहळा याचे साक्षीदार ठरले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ .सायली कोऱ्हाळे यांनी केले. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.






