तळेगाव दाभाडे गोल्डन रोटरी चा विशेष सन्मान.
तळेगाव दाभाडे :
अमली पदार्थ विरोधातील मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचा पुणे नगरीच्या खासदार सौ मेघा कुलकर्णी यांच्या हस्ते विशेष सन्मान एस पी कॉलेज पुणे येथे भोई प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.
त्या वेळी मा प्रवीण पाटील,उप महानिरीक्षक अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र शासन व संगीतकार शिवमणी शंकर डॉ मिलिंद भोई हे उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष संतोष परदेशी व सेक्रेटरी प्रदीप टेकवडे यांनी हा सन्मान स्वीकारला.
यावेळी खासदार सौ मेघा कुलकर्णी यांनी तळेगाव दाभाडे येथे गोल्डन रोटरी करीत असलेल्या कार्याचे कौतुक करून आपण असेच कार्य करत रहा व समाजाला व विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम सांगून त्यापासून मुक्त करा असे आवाहन केले.
हा विशेष सन्मान मिळाल्याबद्दल क्लबच्या सर्व सदस्यांनी अध्यक्षांचे अभिनंदन केले.






