कामशेत ग्रामीण पत्रकार संघाची सन २०२६-२७ कार्यकारिणी जाहीर
कामशेत :
कामशेत ग्रामीण पत्रकार संघ यांच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध पदाधिकाऱ्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील प्रश्नांना न्याय मिळवून देणे, सामाजिक विषय प्रशासनापर्यंत पोहोचविणे तसेच पत्रकारांच्या हितासाठी संघटित पद्धतीने काम करणे हा संघाचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी चेतन वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी प्रफुल्ल ओव्हाळ, सचिवपदी उत्तम ठाकर तर मुख्य सल्लागार म्हणून सुभाष भोते यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. खजिनदारपदी शिवानंद कांबळे, संघटकपदी अनिल घारे आणि पत्रकार परिषद प्रमुख म्हणून सागर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ सल्लागार म्हणून सचिन शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.
संघाच्या सदस्यपदी अविनाश जाधव, मंगेश आखाडे, बाबुराव काळे, अभिषेक बोडके, संकेत जगताप आणि निलेश ठाकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच टीव्ही प्रतिनिधी म्हणून अनिस शेख (न्यूज १८ लोकमत) यांची नियुक्ती करण्यात आली असून इम्रान शेख (ANI) यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर परिसरातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. ग्रामीण पत्रकारितेला अधिक बळकटी देणे, पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे तसेच मावळ परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि विकास विषयक प्रश्न प्रभावीपणे प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी संघ कटिबद्ध राहील, असा विश्वास नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कामशेत व मावळ परिसरातील पत्रकारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देत पत्रकारितेची मूल्ये जपणे आणि सामाजिक बांधिलकी जपत जनतेचा आवाज बुलंद करण्याचे कार्य संघाच्या माध्यमातून पुढेही सुरू राहणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.






