कलापिनीच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सुप्रसिद्ध ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत
तळेगाव दाभाडे.
सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या कलापिनीच्या ४८ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सुप्रसिद्ध ज्येष्ठ कलाकार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी उपस्थित राहणार आहेत. गाढवाचं लग्न, मनोमनी, संकेत मिलनाचा, हसू आणि हसू, मोरूची मावशी यांसारख्या नाटकांमधून आणि तू तिथ मी, देऊळबंद, पुष्पक विमान, सवत माझी लाडकी यांसारख्या असंख्य चित्रपटात, अगबाई सासूबाई, काहे दिया परदेस, अग्निहोत्र यांसारख्या मालिकांमधून अभिनेते म्हणून रसिकप्रिय असे मोहन जोशी यांना प्रकट मुलाखतीमधून ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
वर्धापन दिनानिमित्त कलापिनी गौरव पुरस्कारांचे वितरण होणार आहे. गुरुवार दिनांक १० एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० मिनिटांनी कलापिनी सांस्कृतिक केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्व रसिकांना वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष विनायक अभ्यंकर आणि कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी आग्रहाचे आमंत्रण केले आहे.