किड्स फन टाऊन शाळेमध्ये झालेल्या मेघा हेल्थ चेकअप कॅम्प ऍक्टिव्हिटी साठी महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
तळेगाव दाभाडे :
दिनांक 27 मार्च 2024 रोजी महिला दिनानिमित्ताने ,जवेरी कॉलनी , *किड्स फन टाऊन शाळेमध्ये* झालेल्या मेघा हेल्थ चेकअप कॅम्प ऍक्टिव्हिटी साठी महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कॅम्पमध्ये आपण *ब्लड प्रेशर ,डायबिटीस चेकअप, आय चेकअप, मोफत चष्मे वाटप, महिलांचे ब्रेस्ट स्क्रीनिंग ,सर्वाइकल स्क्रीनिंग, डेंटल चेकअप* असे अनेक हेल्थ चेक अप ठेवण्यात आले होते.
यामध्ये 175 महिलांनी सहभाग घेतला. गायनॅकॉलॉजिकल चेकअप कॅम्प साठी लायन सरिता सोनावले मॅडम उपस्थित झाल्या होत्या आणि ह्या ऍक्टिव्हिटी साठी लायन दीपक शहा यांनी आर्थिक सहकार्य केले. या ऍक्टिव्हिटी मध्ये उपस्थित असलेल्या पाहुण्यांमध्ये *सारिका सुनील शेळके*, लायन सरिता सोनावळे, शैलजा काळोखे ,नितीन फाकटकर सर, डॉक्टर लायन भंडारी, लायन डॉक्टर अनिकेत काळोखे, लायन भरत पोतदार, प्रियंका काळोखे ,शैलेजा काळोखे ,डॉक्टर रेणुका पारवे ,डॉक्टर गार्गी मेहता, डॉक्टर सिद्धी शहा ,डॉक्टर अनामिका सिंग ,शंकर भेगडे ,लायन सुनील वाळुंज ,लायन प्रमिला वाळुंज ,लायन शेखर चौधरी , लायन सुचित्रा चौधरी, लायन राजश्री शहा ,लायन्स अनिता बाळसराफ ,लायन प्रकाश पटेल ,अल्पना हुंडारे, अनिता भेगडे ,संगीता खळदे असे उपस्थित होते. लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी प्रास्ताविक केले, सारिका सुनील शेळके यांनी लायन्स क्लबच्या कामाचे व फाकटकर सर व शंकर भेगडे यांचे कौतुक केले, लायन अध्यक्ष अनिकेत काळोखे यांनी सर्वांचे आभार मानले.