न्यू इंग्लिश स्कूलच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सन्मान

SHARE NOW

वडगाव :

पंचायत समिती मावळ ( शिक्षण विभाग ) याचे वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी ) / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी मधील सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. सुदाम वाळुंज, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मावळ , के.के. प्रधान, गटविकास अधिकारी, तसेच कान्हे केंद्राच्या केंद्रप्रमुख निर्मला काळे इ. मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

यावेळी न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेजच्या इयत्ता ८ वी चे शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी श्रीधर दाभाडे, अस्मिता चिमटे, बालाजी डावळे, निकिता कवडे, भीमा आठवले, शंकर आठवले, या विद्यार्थ्याचा मेडल व प्रशस्तीपत्र देवून सन्मान केला. तसेच इ. ५ वी च्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थीनी श्रेया घोडे व माधुरी इंगळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप विभाग प्रमुख रूपाली बागबंदे, निता शेटे, तानाजी गोडे, अरंविद ढाकणे तसेच पाचवी स्कॉलरशिपच्या विभाग प्रमुख रूपाली शेंडगे, गणेश शेंडगे, सविता मोरे यांचाही सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी प्रयत्नाची कास धरली तर अशक्य ही शक्य होते असे प्रतिपादन सुदाम वाळुंज यांनी केले. विद्यालयाचे प्राचार्य सतीश हाके पर्यवेक्षिका प्रज्ञा गायकवाड यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page