सोमाटणे येथे ऋषीपंचमी निमित्त महिलांचा सत्कार व सामूहिक अथर्वशीर्ष पठण
सोमाटणे (प्रतिनिधी) :
श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा, सोमाटणे यांच्या वतीने येत्या गुरुवार, दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता ऋषीपंचमी निमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले आहे.
Advertisement
याच कार्यक्रमात सोमाटणे गावातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कारही करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण श्री गोरक्षनाथ मठ, गोरक्षनगर, सोमाटणे असून कै. राणू मु-हे यांच्या स्मरणार्थ श्री. मधुकर राणू मु-हे सोमाटणे सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे.
संस्थेच्या वतीने जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
👉 सहभाग नोंदणीसाठी संपर्क क्रमांक – 9146062457 / 97648 62004






