एयरोस्पेस इंजिनिअरिंगचा १९वर्षीय विद्यार्थी अन्वय शेवलीकरचे अवकाश मिती संदर्भात पुस्तक.
लोणावळा
दि ३० पुणे येथील अन्वय प्रलोभ शेवलीकर या क्वीन्स युनिव्हर्सिटी, बेलफास्ट च्या विद्यार्थ्याने, “अवकाशाला तिनच मिती का”या विषयावर पुस्तक लिहिले आहे. विशेष म्हणजे तो केवळ १९,वर्षाचा आहे. हे त्याचे दुसरे पुस्तक आहे.या आधी दहावी मध्ये असताना त्याने *,कॉस्मिक होरायझन” या विषयावर पुस्तक लिहिले होते. अवकाश मिती संदर्भातील अनुत्तरित रहस्य यावर हे पुस्तक आहे.
हे पुस्तक विज्ञानातील सर्वात जुन्या आणि अनुत्तरित रहस्यांपैकी एकाचा शोध घेते.
चांद्रयान-३ च्या ऐतिहासिक यशापासून सुरू होऊन आईन्स्टाईनचे स्पेसटाइम, हॉकिंगचे ब्लॅक होल, क्वांटम एंटँगलमेंट (Quantum Entanglement) आणि ‘होलोग्राफिक सिद्धांत’ (Holographic Principle) पर्यंतचा हा एक रोमांचक प्रवास आहे.
अन्वय या पुस्तकात लिहितो, अवकाश ही एक स्थिर पार्श्वभूमी (Static background) आहे; त्याऐवजी, ते एक ‘कार्य’ (Action) आहे (Quantum Entanglement) मधून निर्माण होते.
भारतीय दृष्टिकोन पाश्चात्य लेखकांच्या दृष्टिकोनाऐवजी, हे पुस्तक भारतीय शास्त्रज्ञांच्या योगदानाला ब्रह्मांडविज्ञानाच्या केंद्रस्थानी ठेवते.
.हे पुस्तक प्रगत भौतिकी आणि भावी पिढीचे तरुण शास्त्रज्ञ यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
भारताची वाढती अंतराळ शक्ती (इस्रो, गगनयान, नॅशनल क्वांटम मिशन) पाहता, हे पुस्तक तरुण वाचकांमध्ये वैज्ञानिक कुतूहल जागृत करण्याचे एक सशक्त माध्यम आहे.
अन्वयचे हे पुस्तक . केवळ जागतिक भौतिकीच समजून घेत नाही, तर आपल्या मुळांशी आणि भारतीय शास्त्रज्ञांच्या कार्याशी जोडतो. खरंतर अन्वयला घरातून संगीत वारसा आहे त्याचे आजोबा पंडित वसंत रामभाऊ शेवलीकर हे संगीत क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व आहेत,संगीत नाट्य अकादमीचा अमृत महोत्सव पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. पण अन्वय ने वेगळी वाट चोखाळत हे पुस्तक लिहिले आहे. वडील प्रमुख हे कुशल व्यावसायिक असून आई सौ स्वाती या उत्तम शिक्षिका आहेत. तर आजोबा रामचंद्र बागदरे व शैलजा बागदरे हे निवृत्त शिक्षक शिक्षिका आहेत. अन्वयने जटिल विषयावरील लेखनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यासंदर्भात त्याचा सर्वत्र गौरव होत आहे. त्याच्या या कार्याची दूरदर्शन ने नोंद घेतली आहे.






