मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने “भव्य मॅरेथॉन” स्पर्धा संपन्न.. व्यसनापासून दूर राहण्याचे पोलीस उपायुक्त गणेश इंगळे यांचे विद्यार्थ्यांना आव्हान..
कोंढवा
दक्षिण पुण्यातील नामांकित असलेल्या मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने “भव्य मॅरेथॉन” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये परिसरातील 21 शाळांनी सहभाग नोंदवला तर दीड हजाराहून अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस उपायुक्त गणेश इंगळे साहेब, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक उपायुक्त राजेश कादबाने,स्केटिंग पटू देशना आदित्य नहार आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू, मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील बबनराव परदेशी, सचिव दिलीप बबनराव परदेशी, अनिल बबनराव परदेशी, मिलन अनिल परदेशी, नितेश दिलीप परदेशी, योगेश अनिल परदेशी, प्रकाश सुनील परदेशी, संस्था समन्वयक प्रतिभा नाईक, सामाजिक कार्यकर्ते चेतन टिळेकर, दिपक चौगुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सकाळी सर्व खेळाडूंना खेळ व नियमांची शपथ देण्यात आली. खेळाडूंना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून धावण्याच्या स्पर्धेला सुरुवात झाली.
मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी सर्व शाळा, खेळाडू, मान्यवरांचे राधाकृष्ण माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अरुण डमाळ सर, राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नागनाथ काळे सर यांनी स्वागत केले.
यावेळी उपस्थित पाहुणे, शिक्षक, विद्यार्थी यांची चहा व नाश्ताची सोय
“servseed foundation” यांच्या वतीने करण्यात आली.
मॅरेथॉन स्पर्धेसाठी उपस्थित सर्व शाळांना, खेळाडूंना प्रमाणपत्र, बक्षीस वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी क्रीडा शिक्षक श्री. गणेश दगडू सर, श्री. किरण घोरतळे सर, सौ. अश्विनी सुतार तसेच राधाकृष्ण विद्यालयातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी, यांच्या अथक प्रयत्नाने संपन्न झाला.
सर्व विद्यार्थ्यांची प्रथमोपचार साठी ॲम्बुलन्स व वैद्यकीय सोय श्री. दीपक चौगुले यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे संस्थेकडून आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त गणेश इंगळे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्तीने खेळ खेळणे गरजेचे आहे. “क्रीडा कौशल्य”, शारीरिक तंदुरुस्ती हीच उद्याची आपली खरी संपत्ती असून त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या अवतीभोवती जर कोणी अमली पदार्थ, गुटखा, तंबाखू व दारू विक्री करत असले ज्यामुळे समाजाचे नुकसान होणार असेल अशा गोष्टी तात्काळ पोलिसांना कळवणे गरजेचे आहे. तरुण पिढी ही उद्याच्या भारताचे भविष्य आहे ही तरुणाई व्यसनाधीन होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तिने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण घोरतळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी कोपनर सर यांनी केले.






