*सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत आणखी कारवाई 3 किलो गांजा व प्रतिबंधित गुटखासह सुमारे 3 लाख 87 हजार रूपयांचे मुद्देमाल जप्त व पाच जण जेरबंद.*

लोणावळा :

लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अमली पदार्थांची चोरून विक्री होत असुन त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती श्री सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्यासाठी श्री सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, तसेच अमली पदार्थांचे सेवन, साठवणुक व विक्री करणार्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संकल्प नशामुक्ती अभियानाचाच एक भाग म्हणून श्री सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अमलीपदार्थ विकणार्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ हस्तगत केले आहेत.

दिनांक 21/9/2024 रोजी मध्यरात्री श्री सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, लोणावळा भागातील भैरवनाथ नगर कुसगाव बु. परीसरात राहणारे काही इसम त्यांचे राहते घरातुन गांजा व प्रतिबंधीत गुटखा त्यांचे ओळखीचे लोकांना विक्री करत असल्याची खात्रीषिर बातमी मिळाल्याने श्री सत्यसाई कार्तिक यांनी रात्रीपासूनच भैरवनाथनगर परिसरात त्यांचे पथकासह सापळा रचला होता. मिळालेल्या बातमीप्रमाणे दि.21/9/2024 रोजी रात्री 00:09 वाजताच्या सुमारास लक्ष्मी लॉंड्रीजवळ भैरवनाथनगर, कुसगाव बु. ता. मावळ जि. पुणे येथे मिळालेले बातमीचे ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी 3 इसम मिळुन आलेले असुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलीस पथकाने जागेवरच पंचांसमक्ष नमूद इसमांचे ताब्यातील क्वालिस गाडी व घर झडतीमध्ये 737 ग्रॅम गांजा व नमुद इसमांचे ताब्यात असलेल्या चारचाकी वाहनामध्ये 128 पुड्डे विमल पान मसाला प्रतिबंधित गुटखा मिळुन आला आहे. सदर कारवाईमध्ये गांजा, प्रतिबंधीत विमल पान मसाला गुटखा व चारचाकी वाहन असा एकुण 3 लाख 27 हजार 137 रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आला आहे. यातील इसमांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल विक्री करता जवळ बाळगला असल्याचे सांगितले आहे.

Advertisement

सदरच्या कारवाईमध्ये इसम नामे 1)आब्बास तपषिर खान उर्फ अरबाज वय 21 वर्शे 2) आवान आब्बास तपषिर खान उर्फ मुन्ना वय 19 वर्शे दोघे रा. लक्ष्मी लॉंड्रीजवळ, भैरवनाथनगर, कुसगाव बु. ता. मावळ जि. पुणे 3) अश्विन चंद्रकांत शिंदे वय 38 वर्शे रा. के के बाजार समोर कुसगाव बु. ता. मावळ जि. पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरोधात पोहवा सिताराम बोकड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पो.स्टे. येथे एनडीपीएस व इतर विविध कलमा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पो.स्टे चे सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे हे करत आहेत.

तसेच दिनांक 22/9/2024 रोजी मिळालेल्या बातमीचे अनुशंगाने लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील इंद्रायणीनगर लोणावळा येथे महिला नामे महेमुना सत्तार कुरेशी हि आपले राहते घरातुन तिचा कामगार राजु लहु जाधव रा. इंद्रायणीनगर या हस्तकांकरवी ओळखीचे इसमांना गांजा या अमली पदार्थाची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर मिळालेल्या बातमीचे अनुशंगाने पंचासमक्ष पथकाने छापा टाकला असता सदर ठिकाणी 2 किलो 168 ग्रॅम गांजासह रोख रक्कम असा एकुण 59 हजार 880 रूपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला असुन यातील इसमांकडे केलेल्या प्राथमि चौकशी मध्ये सदरचा माल विक्री करता जवळ बाळगला असल्याचे सांगितले आहे.

सदरच्या कारवाई मध्ये इसम नामे 1) महेमुना सत्तार कुरेशी वय 54 वर्शे 2) राजु लहु जाधव वय 55 वर्शे दोघे रा. इंद्रायणीनगर, लोणावळा ता. मावळ जि. पुणे यांचेविरोधात लोणावळा शहर पोलीस स्टेशनला पो कॉ सुभाश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एनडीपीएस व इतर कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री भिसे हे करत आहेत.

संकल्प नाशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या वरील दोन्ही कारवाईमध्ये अंदाजे 3 किलो गंजा, 128 प्रतिबंधित विनम पान मसाला गुटख्याचे पुड्डे व एक क्वाॅलीस गाडी असा एकूण रु.3, 87, 000/- (अक्षरी – तीन लाख सत्याऐंषी हजार) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, सपोनि प्रशांत आवारे, मसपोनि विजया म्हेत्रे, सपोनि राहुल लाड, पोलीस उपनिरीक्षक लोसरवार, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, मपो.हवा अश्विनी शेडगे, पो.कॉ गणेश येळवंडे, सुभाष शिंदे, गणेश ठाकुर, प्रतिक काळे , पोहवा/ हनुमंत वाळंज, संदिप मानकर, पोना हनुमंत षिंदे, पवन कराड, मपोशी अक्षदा तावरे, कोमल निंबाळकर या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page