तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील कर्मचा-यांना दिले पॉश अॅक्ट 2013 व पोक्सो 2012 कायद्याचे प्रशिक्षण
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे नगर परिषदे तील कार्यालयीन कर्मचारी यांचे करिता तळेगाव दाभाडे नगरपरिषद व होप फॉर दी चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी लेखक, अभिवाचक संदीप महाजन “मसहूर” यांचा पॉश अॅक्ट 2013 या कायद्याच्या जनजागृती साठी कामाच्या ठिकाणी महीलांवर होणारे लैंगिक छळ या विषयावर मराठी कथा अभिवाचनाचा एकपात्री कार्यक्रम पार पाडला. त्यामध्ये महिलांसाठी कामाचे ठिकाण सुरक्षित व लैंगिक छळमुक्त हवे याबाबत माहिती देण्यात आली, त्याबाबत महिलांनी तक्रार कशी, कोठे करावयाची ? तक्रार करताना कुटुंबात तसेच कामाच्या ठिकाणी येणारी आव्हाने कामाच्या ठिकाणी अंतर्गत समिती म्हणून विशाखा समिती स्थापन करून चौकशी आणि पुढील प्रक्रिया या बाबींची नाट्यमय गुंफण या दीर्घ कथा सादरीकरणात त्यांनी केली.
तसेच बाललैंगिक शोषण आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 (पोक्सो ॲक्ट) याबाबत सचिन करंजुले सर समुपदेशक यांनी कर्मचाऱ्यांना आपण कामानिमित्त घरापासून बाहेर असताना आपली मुले घरी सुरक्षित आहेत का, घरच्यांपासून,नातेवाईकांपासून, शाळेमधील वातावरणात राहून आपली मुले सुरक्षित राहणेकरीता आपल्या मुलांना कशाप्रकारे पालक म्हणुन मार्गदर्शन करावे याबाबत माहिती दिली. या कायद्याची माहिती घेऊन समाजातील घडणाऱ्या प्रसंगांना या कायद्यान्वये कसे कमी करता येईल या उपक्रमासाठी कर्मचा-यांना अतिशय सोप्या पध्दतीने मार्गदर्शन केले.कार्यक्रमाकरीता नगरपरिषदेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.