*समर्थ विद्यालयात स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी दिली मानवंदना*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे स्टेशन भागात नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे स्वातंत्र्य दिन विद्यालयाची माजी विद्यार्थिनी साक्षी देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शालेय समिती अध्यक्ष महेश शहा,मुख्याध्यापिका वासंती काळोखे, माजी मुख्याध्यापिका इरावती केतकर, डॉ.शाळीग्राम भंडारी,बळीराम माळी,भगवान शिंदे ,शंकर भेगडे,अनील शेलार,चेतन नामजोशी,ओंकार आरते,राकेश गरुड उपस्थित होते.यावेळी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी ध्वजास संचलनाद्वारे मानवंदना दिली अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून भारतीय स्वातंत्र्याचे महत्त्व विशद केले देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले साक्षी देशपांडे मनोगतात म्हणाल्या शाळा या पुस्तकी ज्ञानाबरोबर उत्तम संस्कार देणारी गुरुकुले आहेत विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आपल्या अंगभूत गुणांना ओळखून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी शालेय वातावरण शिक्षक पालक सतत प्रयत्नशील असतात. वासंती काळोखे आभार मानले सूत्रसंचालन प्रभा काळे यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे पर्यवेक्षक शरद जांभळे,संजय कसाबी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.