*इंद्रायणी बी फार्मसी महाविद्यालयात पालक मेळा संपन्न*
तळेगाव दाभाडे (दि.२१):- येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर (बी फार्मसी महाविद्यालय) येथे द्वितीय व तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा पालकमळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डॉ. गणेश मस्के, डॉ. मयुरी गुरव प्रा. मुक्ता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
पालक सभेस संबोधित करताना बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे म्हणाले की, पालकांनी वेळोवेळी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महाविद्यालय सदैव कटिबद्ध असून महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांची माहिती यावेळी प्राचार्यांनी सभेत दिली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. मयुरी गुरव यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात बोलताना त्या म्हणाल्या की, पालक व पाल्य तसेच शिक्षक व विद्यार्थी या दुहेरी भूमिका शिक्षक आणि पालकांसाठी कठीण नसतात मात्र त्याबाबत सजगता दाखवली तर पाल्य किंवा विद्यार्थी हा निश्चित यशापर्यंत पोहोचू शकतो.
यावेळी बोलताना प्रा. मुग्धा जोशी म्हणाल्या की, शिक्षक आणि पालक यांनी एकत्र येऊन काम केल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य नक्कीच उज्वल होईल. प्रा.डॉ. गणेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचा आलेख पालकांसमोर मांडत विद्यार्थी व पालक या दोघांच्याही भूमिका अधोरेखित करून सभेस मार्गदर्शन केले.
यावेळी प्राथमिक स्वरूपात सौ. सूर्यवंशी यांनी पालक म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पालकांचे स्वागत प्रा. शारदा कुलकर्णी यांनी केले तर प्रा. विक्रांती कोळी यांनी आभार मानले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा, विश्वस्त निरुपा कानिटकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.