सतपुरुष पूजनीय गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभमुहूर्तावर ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळाच्या– अपेक्षित खर्च दहा लाख रुपये असणाऱ्या सभागृहाच्या विस्तारीकरणाचा देखणा समारंभ संपन्न.

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

सतपुरुष पूजनीय गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभमुहूर्तावर ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळाच्या– अपेक्षित खर्च दहा लाख रुपये असणाऱ्या सभागृहाच्या विस्तारीकरणाचा देखणा समारंभ संपन्न– दानशूर सुमतीलाल शहा यांच्या शुभहस्ते श्री अशोकजी काळोखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

Advertisement

अध्यक्षीय भाषणाबरोबरच अशोकजींनी दोनलाख रुपयां चा धनादेश कॉन्ट्रॅक्टर श्री सय्यद यांना सुमतीलाल शहा यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आल्याबरोबरच  सय्यद यांनी विना विलंब रुपये 11000 ची संस्थेस देणगी जाहीर केली.त्याबद्दल त्यांच मंडळातर्फे कौतुक आणि आभार मानले गेलेत! माजी अध्यक्ष सुधाकर रेम्बोटकर यांनी प्रस्तावनेत यामागील मंडळाचा सहभाग आणि भूमिका स्पष्ट करून दात्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली! या प्रकल्पाचे समन्वयक डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी सुमतीलाल शहांच्या यशस्वी कार्यकर्तृत्वाचा आलेखच सादर केला! सदस्य महेशभाई यांनी अत्यंत आवश्यक असलेल्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या! उपाध्यक्ष आशाताई जैन यांनी आपल्या शुभेच्छांबरोबरच मंडळातर्फे सर्वांचे मनःपूर्वक आभार मानलेत.

या समारंभास कार्यवाह श्रीमती स्नेहल रानडे, कोषाध्यक्ष  विठ्ठल कदम माजी अध्यक्ष  विठ्ठल कांबळे,कार्यकारणी सदस्या  गीता वालावलकर देणगीदार दशरथ  बवले  यांच्याबरोबरच मंडळाचे अनेक सदस्य उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page