पिंपरीतील तरुण करतोय स्वदेशीचा पुरस्कार दिवाळीचे आयुर्वेदिक अभ्यंग स्नान किट माफक किंमतीत उपलब्ध

SHARE NOW

पिंपरी, पुणे (दि. १० ऑक्टोबर २०२५) दिवाळी निमित्त स्वदेशी आयुर्वेदिक उत्पादन वापरून पिंपरी, खराळवाडी येथील संतोष बाबर या तरुणाने आयुर्वेदिक

अभ्यंग स्नान किट केवळ १४० रुपयात उपलब्ध करून दिले आहे.

Advertisement

आकर्षक पॅकिंग बॉक्समध्ये सुगंधी उटणे (५० ग्रॅम), सुगंधी तेल (२० मि. ली.), सुगंधी उटण्याचा साबण (८० ग्रॅम), आकर्षक मेणाची व मातीपासून बनवलेली पणती (१ नग) या सर्व वस्तू केमिकल विरहित, आयुर्वेदिक आणि स्वदेशी आहेत. बॉक्सवर आकर्षक दिवाळी भेटकार्ड आहे. हे अभ्यंग स्नान किट आपण दिवाळीनिमित्त आपल्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना आणि मित्रमंडळींना भेट म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. या किटची किंमत महागाई च्या काळात सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी म्हणजे फक्त १४०/- रुपये आहे. अधिक माहितीसाठी व पिंपरी चिंचवड शहरात मोठी ऑर्डर देण्यासाठी संतोष बाबर (९८६०८६६१६६)

यांच्याशी संपर्क साधावा. किमान २५ किटची ऑर्डर बुक केल्यास अभ्यंग स्नान किट घरपोच देण्यात येईल.

———————————


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page