उद्योजकांनी वेगळ्या वाटा निवडाव्या – विनोद जाधव पीसीईटी कडून लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड प्रदान

SHARE NOW

पिंपरी, पुणे (दि. १३ फेब्रुवारी २०२५) शिक्षण आणि जिज्ञासा ही सदासर्वकाळ माणसाच्या सोबत असते. आपण जिथे शिक्षण घेतो अथवा काम करतो तिथे आपली जिज्ञासा कायम ठेवली तर , कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जागतिक बाजारपेठेत विकसित आणि विकसनशील देशात अनेक उद्योगात खूप चांगल्या संधी उद्योजकांची वाट पाहत आहेत. भारतीय तरुण उद्योजकांनी व उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी जगभरात उपलब्ध असलेल्या या संधीचा फायदा घेऊन आपला उत्कर्ष साधून घ्यावा असे मार्गदर्शन दुबई येथील उद्योजक सावा हेल्थकेअरचे विनोद जाधव यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने आकुर्डी येथील शैक्षणिक संकुलात विनोद जाधव यांना पीसीईटीचा लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड पीसीइटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पोर्टफोलिओ व्यवस्थापन तज्ञ डॉ. मकरंद जावडेकर उपस्थित होते. यावेळी ग्लोबल आंत्रप्रेन्योर्स कॉन्क्लेव्ह २०२५ चे निमंत्रक सचिन इटकर यांनी विनोद जाधव यांच्याशी खुला संवाद साधला. यावेळी जाधव यांनी सांगितले की, मी स्वतः इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा करून, १३ वर्षे नोकरी करून वेगळ्या फार्मसी सेक्टर मध्ये सक्षमपणे काम करत आहे, तर तुम्हालाही काही अशक्य नाही.

Advertisement

कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी प्रास्ताविकात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ची आतापर्यंत ची यशस्वी वाटचाल सांगितली. पीसीईटीने नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला असून प्लेसमेंट बरोबरच उद्योजक तयार करण्यासाठी विशेष सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. उपस्थित विद्यार्थी आणि उद्योजकांनी विनोद जाधव यांना प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून ग्लोबल फार्मसी मार्केट, आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक कायदे यांच्याबद्दल जाणून घेतले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर यांनी विनोद जाधव यांना पीसीईटीचा लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड मिळाल्याबद्दल जाधव यांचे अभिनंदन केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page