सह्याद्री इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी वारी ने दुमदुमले वातावरण
तळेगाव दाभाडे :
सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यात इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांचा समावेश आणि शिशुवर्गातील गटाचा सहभाग होता . यात विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा कर त महाराष्ट्राची सांस्कृतिक वेशभूषा जपली. विद्यार्थिनी ओवी वीर हिने पांडुरंगाचे गीत गायले व आयेशा बाबर हिने आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले.टाळ मृदुंगाच्या गजराने वातावरण मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमास शाळेचे सचिव दत्तात्रय नाटक व मुख्याध्यापिका रंजिता थंपी यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे देखील पूजन करून ,आरती,पालखी पूजन करून पालखीचे प्रस्थान झाले. विविध ठिकाणी पालखीचे पूजन करण्यात आले, दिंडीत साक्षरता,पर्यावरण संवर्धन , स्वच्छता ,महिला सक्षमीकरण यासारखे सामाजिक संदेशाचे फलक दाखवत विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या व जनजागृती केली. कार्यक्रमाची सांगता खाऊ वाटपाने झाली.
कार्यक्रमाचे नियोजन मेघना वीरकर व रवींद्र घोजगे यांनी केले.






