मावळची कन्या ज्योती राजीवडे यांना रमाईची लेक तर भरत राजीवडे यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
तळेगाव दाभाडे:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिव्यांग सेल मावळ तालुका महिला अध्यक्षा सौ ज्योती भरत राजीवडे यांना रमाईची लेक व भरत नाना राजीवडे यांना समाज भूषण पुरस्कार२०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट च्या वतीने माता सावित्रीबाई फुले स्मारक हॉल पिंपरी येथे सर्व जाती धर्मातील वधु वर मेळावा आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार२०२५ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्योती राजीवडे व भरत राजीवडे या दांपत्यास रमाईची लेक व समाज भूषण पुरस्काराने भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी माय रमाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ अमर चौरे. उपाध्यक्ष मंगल चौरे. प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे. गायक सागर शिंदे. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे. अजित शेख. चिमूरकर सर. कुणाल वाव्हाळकर. सुंदर कांबळे. राजन नायर.डाॅ इशिता सूर्यवंशी.ईशा धोंगडे. वैशाली लगाडे. अश्विनी कसबे. अंजली सरोदे. रंजन चोपडे. छाया साळुंखे. भिकनबाई उबाळे. यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात वधु वर परिचयासह समाजिताच्या विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेत सदरील कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचा समारोप स्नेहभजनाने करण्यात आला. यासंदर्भात बोलताना राजीवडे दांपत्य म्हणाले की पुढील कार्यासाठी हा पुरस्कार आम्हाला नेहमीच प्रेरणादायी ठरेल. आमच्या कार्याची दखल घेऊन आम्हाला हा पुरस्कार मिळाल्याने आम्ही आयोजकांचे आभारी आहोत.






