देहुरोड मधे मिरवणुकीत डिजे चा वापर करू नका.वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांचे आवाहन
देहुरोड : देहूरोड पोलीस स्टेशन यांच्या वतीने देहूरोड येथे देहूरोड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळे व दहीहंडी मंडळांच्या पदाधिकारी. कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे म्हणाले की गणेशोत्सव व दहीहंडी तसेच अन्य मिरवणुकीत डीजे चा वापर करू नका. मंडळांनी वर्गणीसाठी सक्ती करू नये. गणेश मूर्तीच्या सुरक्षेची जबाबदारी मंडळाच्या सदस्यांनी घ्यावी. तसेच पारंपारिक वाद्यात मिरवणुका काढून वेळेवर मिरवणुक संपवावी. गणेश मंडळांनी उत्सवाचे नियोजन करून योग्य खबरदारी घ्यावी. गैरप्रकार आढळून आल्यास तत्काळ पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन विक्रम बनसोडे यांनी केले आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते धर्मपाल तंतरपाळे यांनी देखील गणेश मंडळांना विविध सूचना दिल्या. या बैठकीस सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे. पोलीस कॉन्स्टेबल बाबाराजे मुंडे. व इतर पोलीस अधिकारी. देहूरोड.देहू.किवळे.विकासनगर.मामुर्डी. परिसरातील गणेश व दहीहंडी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





