कै केशवराव वाडेकर व्यापारी संकुला मधील स्वच्छतागृहाची दुर्दशा. मागील १ वर्षापासून हे स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहे.
तळेगाव दाभाडे: येथील जिजामाता चौकामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या कै केशवराव वाडेकर व्यापारी संकुलनामध्ये असणाऱ्या स्वच्छतागृहाची दुर्दशा झाली असून हे स्वच्छतागृह मागील १ वर्षापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या व्यापारी संकुला मधील व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे येथील व्यापारी बांधवांना नैसर्गिक विधी करण्यासाठी घरी जावे लागत आहे. या व्यापारी संकुल मधील गाळेधारक जगदीश विठ्ठल भेगडे म्हणाले की तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला वेळोवेळी या स्वच्छतागृहाविषयी कळविले आहे तरीदेखील नगर परिषद या विषयावर कोणतीही कार्यवाही करत नाही. नगरपालिका प्रशासन आमच्याकडून सर्व प्रकारचे टॅक्स घेते. आम्ही व्यापारी संकुलांना मध्ये गाळे घेतले त्यावेळी नगरपरिषदेने आमच्याकडून १०ते १२ लाख रुपये डिपॉझिट घेतले आहे आम्ही सर्व प्रकारचे टॅक्स नगरपरिषदेला वेळोवेळी भरत असतो. तरी आम्हाला निदान चांगल्या स्वच्छतागृहाची सोय करून द्यावी. व्यापारी संकुलनामधील स्वच्छतागृह बंद असल्याने महिलांची मोठी कुचंबना होत आहे. या स्वच्छतागृहाच्या देखभाल अभावी दुरावस्था झाली आहे. नियमित स्वच्छता केली जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.याच संकुलनामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेची सर सेनापती उमाबाई दाभाडे मुलींची शाळा देखील आहे .तरी तळेगाव दाभाडे नगर परिषदेने या संकुला मधील स्वच्छतागृहाची दुरुस्ती व स्वच्छता करून ते नागरिकांना वापरास खुले करावे अशी मागणी व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी केली आहे.