१७ वर्षीय युवकाचा लोणावळा शहरातील वलवन धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

SHARE NOW

लोणावळा: शहरातील वलवन धरणात बुडून निलेश शिंदे(वय१७ वर्ष राहणार कासारवाडी पुणे) या युवकाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना शुक्रवार दिनांक ३०मे २०२५ रोजी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा शहरातील शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकाने वलवन धरणात रेस्क्यू ऑपरेशन राबविले या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सदर मुलाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. प्राप्त माहितीनुसार निलेश शिंदे(वय१७)हा त्याच्या १२ मित्रां बरोबर लोणावळ्यात फिरायला आला होता. वरसोली येथून वलवन धरणाच्या मागील बाजूला सर्व मित्र गेले होते. त्या ठिकाणी धरणाच्या पाण्यामध्ये ते पोहण्या साठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे निलेश शिंदे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकाने तत्काळ सर्व साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पाणबुडी च्या मदतीने शोध मोहीम राबवत निलेश शिंदे याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकातील सुनील गायकवाड. वैभव दुर्गे. योगेश दळवी. मयूर दळवी. सागर दळवी. कपिल दळवी. आकाश मोरे. रोहित मोरे. महेश मसने. कुणाल कडू. महादेव भवर. पिंटू मानकर. सतीश मगर. यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरित्या राबविली. या घटनेचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page