सासूचा छळ करणाऱ्या सुनेला सश्रम करावासाची शिक्षा
मावळ:
सासूचा छळ करून खून करणाऱ्या सुनेला वडगाव मावळ न्यायालयाने दि.27 मे 2025 रोजी जन्मठेप तर आरोपी मुलाला 18 महिन्याचा तुरुंगवास देण्यात आला. हा गुन्हा तळेगाव दाभाडे ता.मावळ हद्दीत 21/5/2021 रोजी घडला. 23/5/2021 तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला. न्यायालय येथे माननीय जे.एल. गांधी सेशन कोर्ट न्यायाधीश वडगाव मावळ यांच्या कोर्टामध्ये तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर क्रमांक 205 / 2021 मध्ये आरोपी नामे पूजा मिलिंद शिंदे हिला कलम *302*,201, 34 अन्वये सश्रम जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.
आरोपी पूजा मिलिंद शिंदे हिने वारंवार होणाऱ्या सासू सोबतच्या वादाचा राग मनात धरून. एके दिवशी वादा दरम्यान सासूचा ब्लाउज ने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह दोन दिवस टेरेसवर पोत्यामध्ये बांधून ठेवला. संध्याकाळी दिराने आई कुठे आहे असे विचारले असता ती माझ्यासोबत वाद करून घरातून निघून गेले असे सांगितले. राहत असलेल्या परिसरात दुर्गंधी येऊ लागल्याने व तक्रार आल्याने शेजाऱ्यांनी तुमच्या टेरेस वरील कसले घाणीचे पोते ठेवले आहे ते फेकून द्या असे सांगितले असता. आरोपी हिने सदर पोते ओढत ओढत नेऊन नाल्यामध्ये नेऊन टाकले. सदर प्रकरणांमध्ये तिच्या नवऱ्याकडूनही तिला अनभिज्ञ मदत झाली.
सरकारतर्फे सदर खटल्यामध्ये विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून स्मिता मुकुंद चौगुले यांची नियुक्ती होती. मा. सरकारी अभियोक्ता स्मिता चौगुले यांनी माननीय न्यायालयात सदर खटल्यामध्ये मुख्यत्वे करून वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे याच्यासह साक्षीदारांची साक्ष घेऊन योग्य पुरावे सादर करून खटला शाबित करणे कामी प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्याकरिता त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले व सरकारतर्फे भक्कमपणे बाजू मांडली.
माननीय न्यायालयाने सदर अभियोग पक्षाचे साक्षी पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी *सुनेस सश्रम जन्मठेप* कारावासाची शिक्षा व दहा हजार दंड तसेच तिचा पती आरोपी क्रमांक दोन मिलिंद शिंदे यास 18 महिने तुरुंगवास व दहा हजार दंड अशी शिक्षा ठोठावली.
सहाय्यक पोलीस आयुक्त देहुरोड कोपनर सो., तळेगाव दाभाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार सो, तत्कालीन तपासी अधिकारी सपोनि नारायण पाटील सो., यांच्या मार्गदर्शनानुसार कोर्ट पोलीस अमलदार अविनाश हरी गोरे यांनी सदर खटल्यामध्ये वडगाव मावळ न्यायालय मध्ये पाठपुरावा केला होता.